व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात ईडीच्या छापेमारीला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने छापेमारी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

सेवा विकास बँकेत अनेक महिन्यांपासून घोटाळा होत असल्याचे बोलले जात होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात बनावट कागदपत्रे घेऊन जवळपास चारशे कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप करण्यात आल्याची जवळपास १२४ कर्जाची प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणात मुलचंदानी यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांना अटक झाली होती. काही महिन्यांआधी अमर मुलचंदानी जामिनावर बाहेर आले आहेत. आता पुन्हा त्यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने चर्चांना उधाण आलंय.

सेवा विकास बँकेवर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे. पिंपरीतल्या मिस्ट्री पॅलेस या इमारतीत मुलचंदानी राहतात. याच ठिकाणी ईडी कसून तपासणी करत आहे. इमारतीखाली पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचे जवान तैनात आहेत. या कारवाईत पुढे काय होणार, याकडे ठेवीदार अपेक्षा ठेवून आहेत.