पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही ईडी चौकशी व्हावी – नाना पटोले

0
36
modi nana patole
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्राकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या मागे ईडीची ससेमिरा लावली आहे. शिवसेना आमदार सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि आता तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी भाजपकडून केली जात आहे. त्यावर भाष्य करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान सहायता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान यापूर्वी नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलगा जय शाह याच्या ईडी चौकशी देखील मागणी केली होती. अमित शहांच्या मुलाची संपत्तीही भरमसाठ वाढलीय, त्याची चौकशी का होत नाही? असा सवाल नाना पटोले यांनी केला होता. तसेच भाजप कडून मुद्दाम ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून सरकारवर दबाव आणण्याचा भाजपचा सुरू आहे, असा आरोप सुद्धा त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here