UPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे UPSC पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षेची तारीख केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. UPSC तर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा आता ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर UPSC मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेच्या तारखेसोबतच यूपीएससीने संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जारी … Read more

वैद्यकीय विदयार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैनंतर; अमित देशमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई । राज्यात संचारबंदीमुळे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा ऐरणीवर होता. या संबंधित शासनाने अंतिम निर्णय हा परीक्षा न घेता मागील एकूण गुणांवरून मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत. या विदयार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैनंतर होतील हे आता निश्चित झाले … Read more

शाळेच्या ‘फी’ संबंधी तक्रार करायची आहे? ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क

मुंबई । लॉकडाऊन काळात तुमच्या पाल्यांची शाळा जर शुल्कासाठी तुमच्यावर दबाव आणत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. शिक्षण विभागाने यासाठी एक यादीच जाहीर केली आहे आणि नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. युवा सेनेने शिक्षण विभागाकडे पालकांसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी केली होती. जेणेकरून या हेल्पलाइनवर पालक शुल्काविषयीच्या तक्रारी नोंदवू शकतील. शाळा फी … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar

पुणे । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

शिक्षक-कर्मचार्‍यांना वेतन न देणाऱ्या विनाअनुदानित शाळांची मान्यता रद्द करा; शिक्षणमंत्र्यांचे आदेश

मुंबई । लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. खाजगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना नियमित वेतन देण्यास शाळा व्यवस्थापन टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देणार नाहीत अशा शाळांची मान्यता रद्द करण्याच्या … Read more

आता धार्मिक शाळांमध्येही दिले जाणार पाठ्यपुस्तकी शिक्षण

नवी दिल्ली । राज्यात धार्मिक शिक्षणासाठी सुरू असलेल्या वेदपाठशाळा आणि मदरशांमध्ये आता पाठ्यपुस्तकांचे शिक्षणही दिले जाणार आहे. यामुळे या शाळांना अभय मिळणार असून, नवीन शिक्षण धोरणाच्या अंतिम मसुद्यात याबाबत सूचना करण्यात आली आहे. देशांतील अनेक भागांत धार्मिक आणि पारंपरिक शिक्षण देणाऱ्या वेदपाठशाळा, गुरूकूल, मदरसे आहेत. मात्र यात पाठ्यपुस्तकी शिक्षण देण्यात येत नसल्याने त्यांना ‘शाळा’ हा … Read more

सावरकरांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे, केंद्र सरकारने एवढे तरी करावे – संजय राऊत 

मुंबई । भारतीय स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी कवी आणि लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन हे अनेक आक्षेपांनी भरले आहे. त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळ्या अंगानी आक्षेप घेतले जात असतात. अनेक वाद घातले जातात. तर एकीकडे सावरकरांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. सावरकर विरोधी आणि सावरकर प्रेमी असे यद्ध … Read more

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; आता गृह जिल्ह्यातूनच देता येईल परीक्षा

नवी दिल्ली । CBSE बोर्डाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. हे विद्यार्थी लॉकडाऊनमुळे जेथे आहेत, तेथूनच त्यांना परीक्षा देता येणार आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी जाहीर केलं. त्यामुळे लॉकडाऊनमुळे वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहेत, त्यांना आता आपापल्या घराजवळ परीक्षा देता येणार आहे. डॉ. पोखरियाल यांनी ट्विटरवरून … Read more

दहावीच्या निकालाबाबत SSC बोर्डानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे । दहावीच्या निकालाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC) एक मोठा निर्णय घेतला आहे. एसएससी बोर्डाकडून मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील भूगोल विषयाचा पेपर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द झाला होता. आता या विषयाचे गुण कसे दिले जाणार ते बोर्डाने जाहीर केले आहे. बोर्डाने या संदर्भात एक परिपत्रक जरी … Read more

शाळा, कॉलेज उघडण्याबाबत गृह मंत्रालय म्हणते..

नवी दिल्ली । देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन वाढत जाऊन चौथ्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरम्यान चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शहरांमधील रुग्णांची संख्या लक्षात घेत नियमांमध्ये शिथिलता देखील दिली आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार का? याबाबत गृह मंत्रालयाने … Read more