”परीक्षा पे चर्चा २०२०LIVE”: पंतप्रधान मोदींचा विद्यार्थांशी संवाद

परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं रहावं याबाबत विद्यार्थ्यांना कानमंत्र देत आहेत. सलग तिसऱ्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा ‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून ते सर्वांशी थेट संवाद साधत आहेत.

हेच कर्मवीर अण्णांचे स्वप्न, रयत शिक्षण संस्थेत राज्याबाहेरील मुलेदेखील – शरद पवार

नाशिक प्रतिनिधी | आज रयत शिक्षण संस्थेत राज्यातीलच नाही तर राज्याबाहेरील मुलेदेखील शिक्षण घेत आहेत. यातून समाजात ही पिढी आत्मविश्वासाने उभी राहते आहे. हेच कर्मवीर अण्णांचे स्वप्न होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेविषयी गौरवद्गार काढले. संस्थेच्या विंचुर,ता. निफाड,जि. नाशिक येथील नूतन शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. … Read more

RBI मध्ये ९२६ पदांसाठी भरती, मुंबईसाठी सर्वाधिक रिक्त पदे

पोटापाण्याची गोष्ट | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. मुंबई आॅफिसकरता सर्वाधिक ४१९ तर न‍ागपूर आॅफिसकरता १३ जागा रिक्त आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – सहाय्यक एकूण जागा – ९२६ जागा शैक्षणिक पात्रता … Read more

बहुप्रतिक्षित ‘म्होरक्या’चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पहा फक्त एका क्लिकवर..!!

बहुप्रतिक्षित म्होरक्या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी संध्याकाळी रिलीज करण्यात आला आहे.

दिलदार मुख्यमंत्र्यांची अनोखी दुनियादारी, चणे-फुटाणे विकून अधिकारीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या संतोषला दिला मदतीचा हात

मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत चणे-फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या संतोष साबळे यास मदतीचा हात दिला आहे. अभ्यास चालू असताना प्रामाणिक प्रयत्न कर, तुला लागेल ती मदत केली जाईल असे सांगून उद्धव ठाकरेंनी यावेळी संतोषला दिलासा दिला.

आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा; कोल्हापुरात अंगणवाडी सेविका आक्रमक

अंगणवाडी महिलांना दिलेली भाऊबीज शिमगा आला तरी दिला जात नाही. तालुका व जिल्हा प्रशासनाच्या गैरसोयीमुळे अंगणवाडी शिक्षिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन एक सांगत आहे आणि प्रशासन एक सांगत आहे. त्यामुळे अंगणवाडी महिलांची आर्थिक कोंडी होत असल्याचं मत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ.आप्पा पाटील यांनी व्यक्त केलं.

निराशाजनक! १६ लाख रोजगाराच्या संधी होणार कमी

मुंबई | देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे समोर आले आहे. बेरोजगारांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण असून याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने केलेल्या एका पाहणीतून सदर माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे स्टेट … Read more

भारतातील परिस्थिती दुःखद, निर्वासितांनाही मोठं व्हायचा अधिकार आहे – सत्या नाडेला

बांगलादेशमधून आलेला एखादा निर्वासित भारतातील एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष झाल्याचेही मला पहायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.

युवाशक्तीने पुनरुज्जीवीत झाली विदर्भ पर्यावरण परिषद

विदर्भ पर्यावरण परिषदेत तरुणाई मोठ्या उत्साहाने आणि जोमाने सहभागी झाली.

जेएनयूचे विद्यार्थी आंदोलनासोबत अभ्यासातही हुशार; IES परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १८ ‘जेएनयू’कर

२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे.