आरटीईच्या प्रवेश निश्चितीसाठी आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ

RTE

औरंगाबाद | लॉकडाऊनमुळे मागील चार महिन्यापासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया 11 जून रोजी सुरू करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांमध्ये शाळेत 667 मुलांनी तात्पुरते प्रवेश नोंदवले आहेत. त्यातील कागदपत्रांची पडताळणी करून फक्त 99 प्रवेश निश्चित झालेले आहेत. पहिली साठी तीन हजार 621 तर प्री-प्रायमरी साठी दोन शाळांमध्ये केवळ 4 जागांची क्षमता आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना … Read more

पोषण आहाराच्या निधीसाठी पाल्याचे खाते उघडण्यासाठी पालकांची बँकेत गर्दी

Poshan aahar

औरंगाबाद | लॉकडाऊनमध्ये कोरोना काळात शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये म्हणून शाळांकडून कोरडा शिधा देण्यात येत होता. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषण आहारा ऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) च्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते उघडण्याचे आदेश राज्य शासनाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे करुणा काळात बँकेत … Read more

आता ऑनलाईन शिक्षणाची चिंता डोन्टवरी, शिक्षण आपल्या दारी; महापालिकेचा नवीन उपक्रम

lockdown education

औरंगाबाद | गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल नसतात तर काही ठिकाणी नेटवर्कची अडचण असते या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात जाऊन शिक्षण देणार आहेत. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन दरम्यान दीड वर्षापासून … Read more

प्राध्यापक भरतीचा निर्णय आठ दिवसात – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

uday samant

औरंगाबाद | अनेक दिवसापासून राज्यातील प्राध्यापकांच्या भरतीला स्थगिती देण्यात आली असून येत्या आठ दिवसात प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांनी ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यातील विद्यापीठे व … Read more

खुशखबर..! मनपा करणार सातारा- देवळाई मध्ये नवीन पाच शाळा सुरू होणार

औरंगाबाद : महापालिकेने शहर हद्दीत समावेश झालेल्या सातारा- देवळाई भागात आता नवीन पाच शाळा सुरु करण्याचे ठरवले आहे. तेव्हा या शाळा सुरू केल्यास पूर्ण क्षमतेने विद्यार्थी मिळतील का, यासाठी महापालिकेडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून चांगला प्रतिसाद समोर आला की लगेच चालू आर्थिक वर्षांपासून शाळा सुरू करण्याचा पालिकेचा विचार असल्याच समोर आले आहे.  राज्य … Read more

CBSE 12 वी निकालाचा फॉर्म्यूला ठरला, जाणून घ्या नवा फॉर्म्यूला

नवी दिल्ली वृत्तसंस्था: करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन रद्द करण्यात आल्या होत्या. CBSE 12 वी परीक्षेच्या संदर्भात निकाल प्रकरणी नियुक्त केलेल्या तेरा सदस्य समितीने गुरुवारी आपला अहवाल सादर केला आहे. या समितीने बारावीच्या गुणपत्रिका तयार करण्यावर अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये खालील निकष निकालासाठी लावण्यात आले आहेत. CBSE told the Supreme … Read more

महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती

uday samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: इयत्ता बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी CET परीक्षेच्या बाबतीत मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा आयोजित केली जाऊ शकते अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले. करोना … Read more

नविन मेडिकल कॉलेजला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथे सुरू होणाऱ्या मेडिकल कॉलेजला स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा ठराव सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यावेळी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नाना पाटील यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वसाधारण सभेने मराठा आरक्षणाचाही ठराव मंजूर करून याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी … Read more

खासगी शाळा चालकांनो शैक्षणिक शुल्काकरता गळचेपी कराल तर दखल घेवू : खा. छ. उदयनराजे

udayanraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाचा काळ लवकरच जाईल, याचा विचार खाजगी शाळा चालकांनी करुन केवळ शैक्षणिक फी किवा शैक्षणिक शुल्क दिले नाही म्हणून पाल्याची आणि पालकांची अडवणूक करु नये. पालकांनीही आपली परिस्थिती असेल तर ज्ञानदान करणा-यांना यथोचित सहकार्य करावे. मात्र जर का कोणी शाळाचालक कोरोना काळात पालकांची आणि पाल्यांची शैक्षणिक शुल्काकरता गळचेपी करत असेल … Read more

SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ महिन्यात होणार निकाल जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. शाळांना शासनाने ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र … Read more