Job Skills : ग्राफिक डिझायनिंग अन् डिजिटल मार्केटिंगमधील कौशल्यांसाठी करा ‘हे’ कोर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Job Skills : सध्या देशात बेरोजगारांची संख्या वाढते आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 6.50 टक्के होता. अधिकृत आकडेवारी नुसार देशात सुमारे 6 कोटी तरुण बेरोजगार आहेत. सध्या देशातील बेरोजगारांमध्ये कोणतेही कौशल्य आत्मसात नसलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. आता रोजगाराबाबत बोलायचे झाले तर आजकालच्या इंटरनेटच्या युगात डिजिटल इंडस्ट्रीमध्ये भरपूर वाव आहे. एका रिपोर्ट्सनुसार, भारताची डिजिटल इंडस्ट्री 2025 पर्यंत 160 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

Marketing Design Certificate

ज्यामुळे डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग असे काही कोर्सेस करून या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या मुबलक संधी मिळणार आहेत. आज आपण अशा काही कोर्सेसची माहिती जाणून घेणार ​​आहोत जे आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध आहेत.

ग्राफिक डिझाइन स्पेशलायझेशन

Coursera या वेबसाईटवर ग्राफिक डिझाईन स्पेशलायझेशन हा कोर्स करता येईल. तसेच या कोर्ससाठी नावनोंदणी देखील सुरू झाली असून हा कोर्स फ्री मध्ये असेल. बिगिनर्स लेवलच्या या कोर्सचा कालावधी 3-6 महिन्यांचा असेल. इथे हे लक्षात घ्या कि, या कोर्स दरम्यान ग्राफिक डिझायनिंग बाबत बेसिक माहिती दिली जाईल. Job Skills

डिजिटल मार्केटिंग फंडामेंटल्स कोर्स

Google च्या फंडामेंटल ऑफ डिजिटल मार्केटिंग कोर्सला इंटरएक्टिव्ह अ‍ॅडव्हर्टायझिंग ब्युरोकडून मान्यता मिळाली आहे. या कोर्समध्ये प्रॅक्टिकल्सचाही समावेश असलेला हा कोर्स 40 तासांचा आहे. Job Skills

The Importance of Graphic Design in Digital Marketing - Identity.Agency

Google अ‍ॅड डिस्प्ले सर्टिफिकेशन

गुगलच्या स्किल शॉपवर या कोर्सच्या मदतीने तुम्ही जाहिरात गुंतवणूकीबद्दल जाणून घेऊ शकता. तसेच गुगल डिस्प्ले वापरून आपल्या स्किल्सची चाचणी देखील करू शकता. हा कोर्स फक्त 2.6 तासांचा आहे. Job Skills

Google अ‍ॅड सर्च सर्टिफिकेशन

या गुगल अ‍ॅड सर्च सर्टिफिकेशनमध्ये गूगल सर्च आणि कीवर्डसाठी ट्रेंड आहे. हा कोर्स देखील फक्त 2.6 तासांचा आहे.

Top 5 Impact of Graphic Design in Digital Marketing

Google अ‍ॅड अ‍ॅप सर्टिफिकेशन

Google अ‍ॅड अ‍ॅप सर्टिफिकेशन कोर्स फक्त 2.8 तासांचा आहे. याद्वारे आपण गुगल अ‍ॅप कॅम्पेन तयार करण्यात पटाईत होऊ शकता. Job Skills

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://in.coursera.org/

हे पण वाचा :
आपल्या Aadhar Card मधील माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
Multibagger Stock : सोलर सर्व्हिस पुरवणाऱ्या ‘या’ कंपनीने एका वर्षात दिला 1500% नफा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण, आजचा भाव पहा
सर्वात स्वस्त iPhone 13 कुठे मिळत आहे ते जाणून घ्या
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 25GB डेटा