बच्चू कडू-रवी राणा वादावरून खडसेंची शिंदे गटावर खोचक टीका; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्यावर खोके घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केल्यानंतर या दोघांमध्ये हा वाद सुरु झाला. यानंतर बच्चू कडू यांनी रवी राणांच्या आरोपावर प्रतिक्रिया देत आरोपांप्रकरणी पुरावा सादर करण्यास सांगितले आणि जर ते केले नाहीतर सात ते आठ आमदार आपल्या संपर्कात असून सरकारमधून बाहेर पडू असा इशारा बच्चू कडू (bachchu kadu) यांनी दिला आहे. या दोघांमधील वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
“बच्चू कडू (bacchu kadu) -रवी राणा वाद ही तर सुरुवात आहे. ज्या आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यापैकी बऱ्याच आमदारांमध्ये सध्या नाराजी आहे. तसेच अपक्ष आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता आता हळू हळू बाहेर यायला लागली आहे. बच्चू कडूंच्या माध्यमातून ही सुरूवात झालेली आहे. यापुढे बरच काही बघायला मिळणार आहे” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

दिवा विझतो तेव्हा तो फडफड करतो
बच्चू कडू (bacchu kadu) यांनी इशारा दिल्यानंतर आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका मांडत “दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे”, अशा खोचक शब्दांमध्ये बच्चू कडूवर टीका केली आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!