‘एकट्या देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष चालत नाही, तर….’ – रावसाहेब दानवे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । भाजपला राम-राम ठोकताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. सध्या भाजपमध्ये एकाधिकारशाही सुरु आहे आणि एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपमध्ये कुठलाही एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. भाजपमध्ये सामूहिकरित्या निर्णय घेण्याची पद्धत आहे. त्यामुळं एकट्या देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष चालत नाही’, असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

‘भाजपमध्ये मी नाथाभाऊंपेक्षा सीनियर आहे. त्यामुळं आम्हा सर्वांना एकमेकांची वाटचाल माहिती आहे. मी प्रदेशाध्यक्ष असताना काही गोष्टी फडणवीसांना मान्य नव्हत्या. पण मी त्यांना पटवून दिल्या आणि त्यांना त्या गोष्टी मान्य कराव्या लागल्या. त्यामुळे राज्यात एकटे फडणवीस पक्ष चालवतात हा आरोप आपल्याला मान्य नाही’, रावसाहेब दानवे यांनी आवर्जुन सांगितलं. भाजपमध्ये एक ठरलेली प्रक्रिया आहे. भाजपमध्ये कुणीही एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही. पक्षात सामूहिकरित्याच निर्णय होतात. तसंच कुणावरही निर्णय लादला जात नाही, असं दानवे म्हणाले. (Union State Minister Raosaheb Danve reaction to Khadses resignation)

…म्हणून खडसेंची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली
‘एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्याकडे राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी अशी राज्यासह केंद्रीय नेतृत्वाची इच्छा होती. पण नाथाभाऊ यांनी तब्येतीचं कारण देत प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा भाजपमध्ये एकट्या नाथाभाऊंकडे लाल दिव्याची गाडी होती. त्यावेळी खडसे यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं असतं तर कदाचित पुढे ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरले असते, असं असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केलाय.

नाथाभाऊ भाजप सोडून गेल्याचं दु:ख- दानवे
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय दुर्दैवी आहे. पण जळगावमध्ये भाजप पक्ष मजबूत आहे. त्यामुळं नाथाभाऊ राष्ट्रवादीत गेल्यामुळं जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसेल, या शक्यतेला कुठलाही आधार नसल्याचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment