शिंदे-भाजप सरकारने जिंकली बहुमताची चाचणी

Eknath Shinde Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- भाजप सरकारने बहुमत चाचणी मते तब्बल 164 मते मिळवून बहुमत जिंकलं आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास सुरुवात झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी शिरगणनेद्वारे बहुमताची चाचणी करण्यात आली.

आज सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे यांच्याबाबत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर बहुमताच्या चाचणीस सुरुवात केली. यावेळी शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी शिंदे व भाजपला मते दिली. यावेळी 164 मतांनी शिंदे विजय मिळवत शिंदे – भाजप सरकारने बहुमताची चाचणी जिंकली. तर शिंदे यांच्या प्रस्तावाच्या विरोधात 99 मतं पडली.

बहुमतासाठी शिरगणती सुरू झाल्यानंतर विजय वडेट्टीवार आणि अशोक चव्हाण विधानभवनात दाखल झाले आहेत. तर आदित्य ठाकरे अगदी शेवटच्या क्षणी विधानभवनात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाबाहेरच राहिले आहेत. तर अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केले.