औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Eknath Shinde Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा. पाटील, असे नामांतर महाविकास आघाडीने चुकीच्या पध्दतीने केल्याने शिंदे- भाजप सरकारने निर्णयाला स्थगिती दिली होती. या नामांतराच्या निर्णयावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. नामांतर निर्णयावर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची तिसरी बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी ते पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं. याबाबत कायदा करून ठराव तयार करावा लागतो. त्यानुसार औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतरण करण्यात आले आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्यात आले आहे. येत्या अधिवेशनात नामांतराबाबत ठराव मांडून त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत.

 

एमएमआरडीए खूप मोठा प्रोजेक्ट 

एमएमआरडीए खूप मोठा प्रोजेक्ट तयार करत आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल. मेट्रो, ट्रॅफिकचे कोंडी सोडवण्याचं काम सुरू आहे. एमएमआरडीए अनेक कामे करत असते. एमएमआरडीएला 60 हजार कोटीपर्यंतचं कर्ज उभारण्यासाठी मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात 12 हजार कोटी रक्कमेची आज शासनाने हमी दिलेली आहे. राज्यात कोणताही प्रकल्प थांबणार नाही, याची काळजी घेतल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.