व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही – एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा मनपा आणि पोलीस प्रशासनाने हटवला. यानंतर अमरावती येथील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याबाबत कुठलाही प्रकार हा खपवून घेतला जाणार नाही, असे मंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावती येथील घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमरावती येथे काल एक घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत कुठलाही असा प्रकार केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. कालच्या प्रकरणाची संपूर्णपणे हि शहानिशा हि केली जाईल. पूर्ण चौकशी केल्यानंतर गृहविभाग कारवाई करेल.

नेमके काय घडले प्रकरण?
अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनाने आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला. त्यानंतर आज अमरावती येथे राणा दांपत्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच निषेध नोंदवत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली.