महाराष्ट्रात औरंगजेबची सत्ता आहे का?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीत राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा आज पहाटे हटवण्यात आला. या घटनेवरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेत्या, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला ! कॉंग्रेसने कर्नाटकात विटंबना केली तेंव्हा भाजप कार्यालयावर मोर्चा काढणारी शिवसेना आता शांत का? महाराष्ट्रात औरंगजेबची सत्ता आहे का? असा सवाल भाजपने केला आहे.

अमरावती य याठिकाणी आज घडलेल्या घटनेनंतर भाजपने ट्विट करीत ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “महाराष्ट्रात औरंगजेबची सत्ता आहे का? काँग्रेस नेत्या, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात अमरावती शहरात बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला ! ज्यावेळी कॉंग्रेसने कर्नाटकात विटंबना केली तेंव्हा भाजप कार्यालयावर मोर्चा काढणारी शिवसेना आता शांत का आहे.? असा सवाल भाजपने विचारला आहे.

 

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर

दरम्यान नवनीत राणा यांनीही अमरावती येथून या घटनेबाबत मत व्यक्त केले. ज्या महाराष्ट्राला घडवून आणण्याचे काम आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. त्या महाराष्ट्रात जेव्हा शिवसेनेची सत्ता येते. जी शिवसेना हि भिकारी सारखे मतदारांपुढे जाऊन आमदार, खासदार याच्या निवडीसाठी भीक मागत आहेत. त्या महाराष्ट्रात शिवसेनेची छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्याची स्थापना करण्यासाठी आम्हाला वारंवार परवानगी मागावी लागत आहे. आम्हाला परवानगी घ्यायची गरज काय? उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना आदरणीय बाळासाहेब ठाकरे याच्या विचारांचा विसर पडलेला आहे, असे वाटते, असे नवनीत राणा यांनी म्हंटले.

Leave a Comment