आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

0
170
Eknath Shinde Toll Waiver
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकरी, भाविक दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. “पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येत आहे,” असा महत्वाचा निर्णय शिंदे यांनी घेतला.

एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विविध विभागातील अधिकाऱ्यांची आढाव बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रथम राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानांतर त्यांनी मुख्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात सूचना केल्या. त्यानंतर शिंदे यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नसल्याचा निर्णय जारी केला. तसेच टोलमाफीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यावेळी त्यांनी गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून प्रवाशांना सवलत दिली होती. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री बनलेल्या शिंदे यांनी आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफि केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here