हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाणदिन आहे. त्यानिमित्त राज्यपाल भगतसिह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी “भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. या महामानवामुळे आपण सगळ्या जगात ताठ मानेने उभे आहोत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला एक मुख्यमंत्री झाला. संधी मिळाली ती केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आमचं सरकार बाबासाहेबांच्या मार्गावर वाटचाल करेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
चैत्यभूमीवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या घटनेने सगळ्यांना अधिकार दिले, जगण्याचे हक्क दिले. यामुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊन देशाची सेवा करू शकला. महापुरुष इतिहास घडवतात, पण बाबासाहेबांनी अपमानकारक जीवन जगणाऱ्यांना दिलासा देऊन इतिहास बदलला.
आमच्या सरकारमध्ये इंदू मिलचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही कामाची पाहणी केली तसंच आढावा घेतला आहे. राजगृह हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो जोपासला जाईल. लोअर परेल इथल्या स्मारकाची पाहणी केली जाईल, बाबासाहेबांच्या आठवणी जपण्याचं काम केलं जाईल”, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन https://t.co/9eZcVHtnA1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 6, 2022
इंदू मिलचं काम लवकरच पूर्ण होईल : फडणवीस
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक आश्वासन दिले. ते म्हणाले की, संविधानाने लोकशाही जिवंत ठेवली. सामान्यातल्या सामान्य लोकांसाठी संधी उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार मानण्यासाठी आपण त्यांना मानवंदना देतो, त्यांनी जगाच्या कल्याणाचा संदेश दिला, गौतम बुद्धाचे विचार प्रत्येक विचार् संविधानिक मूल्य म्हणून प्रत्येक व्यक्तीत पोचवण्याचे प्रयत्न केला. चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होतो, हे घडवण्याचं काम संविधान करतो. जेव्हा पंतप्रधान म्हणतात, माझ्यासाठी संविधान हा एकच धर्मग्रंथ आहे, याने मी राज्य चालवेन. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आश्वासन देतो की, इंदू मिलवर अतिभव्य स्मारक हातात घेतलंय, वेगाने काम सुरू आहे. लवकरच काम पूर्ण होईल.