शरद पवार शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुकांचा वर्षाव

eknath shinde sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांच्या तोंडात साखर आहे. मला जेव्हा जेव्हा सल्ल्याची गरज असते तेव्हा तेव्हा मी त्यांना फोन करतो आणि ते सुद्धा मला चांगले सल्ले देतात असं शिंदेनी म्हंटल आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात शिंदे बोलत होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवारांचे मार्गदर्शन नेहमी मिळत असत. सत्तेवर कोण आहे, हे न पाहता, पवार साहेब मार्गदर्शन करतात. मला सुद्धा जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा फोन करतात आणि सूचना देतात . सहकार क्षेत्रात त्यांचं असणारं योगदान हे नाकारता येणार नाही असं म्हणत त्यांनी शरद पवारांचे कौतुक केलं आहे.

https://www.facebook.com/mieknathshinde/videos/1953119818413157/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB

पवार साहेबानी देशात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सहकार क्षेत्रात तर शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. शरद पवार सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत. त्यानुसार शेतीत किंवा उद्योगात बदल केले पाहिजे असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हंटल.