देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख

Devendra Fadnavis Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर ते मुख्यमंत्री नसून उपमुख्यमंत्री आहेत अन् देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका होऊ लागली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलेल्या एका वक्तव्याने चर्चा होऊ लागली आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत, हेच शिंदे विसरले. शिंदे यांनी ‘राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी.. असा उल्लेख केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाचे काल उद्घाटन करण्यात आले. कोकण महोत्सवादरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, कोकणाचं एक स्वत:चं वेगळं वैशिष्ठ्य आहे. जंगल, समुद्र किनारे आणि किल्ले कोकणाला लाभलेले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोकणातील माणूस आंब्यासारखा गोड असतो. कोकणातील माणूस गोड आहे सर्वांवर प्रेम करणारा आहे. मनाशी काही ठरवलं तर आरपारची लढाई लढणारा देखील कोकणातील माणूस आहे.

मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असलेले एकनाथ शिंदे यांनीच हे वक्तव्य केल्याने आता विरोधकांकडून शिंदेंवर निशाणा साधला जाणार हे नक्की. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ राजकीय वर्तुळात चांगलाच व्हायरल होत आहे.