एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींची लायकी काढली; ठाकरेंवरही साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागातून भारताला स्वातंत्र्य मिळाल आहे, तुमची सावरकर होण्याची लायकी सुद्धा नाही असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध केला आहे. तसेच सावरकरांच्या मुद्द्यावरून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं आहे. सह्याद्री अतिथिगृहावरील आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य आपण सर्वच जण उपभोगतोय. अंदमानातील जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या मरणयातना भोगल्या त्या राहुल गांधींनी १ दिवस भोगून दाखवाव्या मग त्याला त्याची किंमत कळेल असं म्हणत राहुल गांधींच्या वृत्तीचा आणि कृत्याचा एकनाथ शिंदे यांनी निषेध केला. राहुल गांधी सातत्याने म्हणतायत की मी सावरकर नाही गांधी आहे, परंतु सावरकर होण्याची तुमची लायकी सुद्धा नाही, त्यांच्याएवढा त्याग तुमच्यात नाही अशी जहरी टीकाही शिंदेनी केली.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. मालेगाव येथील सभेत उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा राहुल गांधींना दिला होता. परंतु सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? बाळासाहेब ठाकरे यांनी जस जयप्रकाश नारायण यांच्या कानाखाली मारली तस तुम्ही करणार आहात का? असा सवाल एकनाथ शिंदेनी ठाकरेंना केला. उद्धव ठाकरेंच विधान म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. विधासभेच्या अधिवेशनात राहुल गांधींविरोधात एकही शब्द यांनी काढला नाही, उलट राहुल गांधींची खासदारकी गेल्यांनतर काँग्रेससोबत काळ्या फिती बांधून यांची लोक साथ देत होते असं म्हणत ठाकरेंची भूमिका दुटप्पी आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.