हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. दरम्यान शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांच्यावर क्राईम ब्रांच पोलिसांनी अटकेची कारवाई केली. सुरुवातील शिंदे यांना अगोदर चौकशी करुन सोडून देण्यात आले होते. पण नंतर पुन्हा रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. महेश शिंदे यांच्यासह एकूण 10 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व जण एका क्लबमध्ये जुगार खेळत होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यावतीने शुक्रवारी महेश शिंदे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. शिंदे हे आपल्या अन्य 10 साथीदारांसह मीरारोड मधील सीजीजी क्लब हॉटेलात जुगार खेळताना आढळून आले. याबाबतची माहिती मीरा-भाईंदर आणि वसई-विवार पोलिसांच्या क्राईम ब्रांचला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी छापा टाकत बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली.
जुगार प्रकारणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्राईम ब्रांच पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुरुवातील महेश शिंदे यांच्यासह इतर 10 जणांनाही ताब्यात घेतले आहे. आता याप्रकरणी काय कारवाई होणार? याकडे सेवाचे लक्ष लागले आहे.