हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप आणि शिंदे गटाला मोठं यश मिळाले आहे. भाजपने 82 तर शिंदे गटाने 40 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आभार मानणारे 1 पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या गटाचा उल्लेख शिवसेना केला असून शिवसेनेला उद्धव ठाकरे गट अस म्हणत डिवचले आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल… शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार… अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासोबत त्यांनी एक पोस्टर शेअर केल ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या गटाचा उल्लेख शिवसेना अस केलं आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1555787039609483264?t=ppfTVnv3b0f_F9n8pPBUNQ&s=19
काय आहे पोस्टर मध्ये?
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला जनतेचा कौल..
भाजपा- 82
शिवसेना- 40
उद्धव ठाकरे गट- 27
राष्ट्रवादी काँग्रेस- 53
काँग्रेस- 22
इतर- 47
यामध्ये त्यांनी स्वतःच्या गटाचा उल्लेख शिवसेना अस करत शिवसेनेला मात्र उद्धव ठाकरे गट अस म्हंटल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे- ठाकरे वाद पेटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात हे आता पाहावं लागेल.
दरम्यान, उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टाच्या दारात आहे. सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्टला यावर पुन्हा एकदा सुनावणी होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष्य या सुनावणीकडे लागले आहे. शिवसेना नेमकी कोणाची ?? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हे लवकरच स्पष्ट होईल.