एकनाथ शिंदेंचा रिक्षासोबतचा जुना फोटो व्हायरल! जाणुन घ्या यामागील सत्य

Eknath Shinde Duplicate Photo
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा 25 वर्षांपूर्वीचा एक जुना फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो 1997 मधील आहे असा दावा या फोटोमध्ये करण्यात आला आहे. मात्र, हा फोटो एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे फोटोत असणारे आणि डिट्टू एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखे दिसणारे हे दाढी-मिशावाले रिक्षाचालक नक्की आहेत कोण आहेत ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

तर हा फोटो पिंपरी चिंचवड शहरातील आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक बाबा कांबळे यांचा हा फोटो आहे. त्यांनी १९९७ साली हा फोटो काढला होता. मात्र, हा फोटो एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा असल्याचे सांगून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला आहे. पिपंरी चिंचवडच्या रातराणी चौकात दरवर्षी श्रावण महिन्यात पूजा होते. या पूजेदरम्यान 1997 साली बाबा कांबळे यांनी हा फोटो काढला होता.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजकारणात येण्याआधी रिक्षा चालवत असत. ते मुळचे साताऱ्याचे असले तरीही त्यांचं शिक्षण ठाण्यात झालं. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. येथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. एक सामान्य रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पूर्वीपासूनच दाढी आहे आणि हीच त्यांची ओळख आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांकडून या फोटोची शहानिशा करण्यात आली. तेव्हा हा फोटो एकनाथ शिंदे यांचा नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

हे पण वाचा :
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

हा तर ‘मविआ’च्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय; ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक

हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय; कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश