हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा एक निर्णय दिल्यानंतर आज पुन्हा एक महत्वाचा निर्णय आयोगाने दिला आहे. उद्धव ठाकरेंना आता पोट निवडणुकीपर्यंतच मशाल हे चिन्ह आणि नाव वापरता येणार आहे. निवडणुकीनंतर चिन्ह व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरता येणार नाही, असा मोठा निर्णय आयोगाने नुकताच दिला आहे. तशी ऑर्डर आयोगाने काढली आहे.
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी निवडणुकीत मशाल हे चिन्ह वापरले होते. मशाल चिन्हाविरोधातही निवडणूक आयोगात समता पक्षाकडून निवेदन देत दावाही दाखल करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह काढून घ्यावं, अशी मागणी समता पक्षाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या दरम्यान आता निवडणूक आयोगाने यावर महत्वाचा निर्णय दिला असून कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणूक पर्यंतच उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरता येणार आहे. 26 तारखेला पोट निवडणूक झाल्यानंतर ठाकरेंना चिन्ह व नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई करण्यात आली आहे.
समता पक्षाचे कैलाश कुमार यांनी निवडणूक आयोगाकडे एक निवेदन दिले असून
शिवसेनेला त्यांचं गोठवलेलं धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे त्यांना मशाल चिन्ह देण्याचं कोणतंही कारण राहिलेलं नाही. कारण महाराष्ट्र किंवा इतर दुसऱ्या राज्यात पक्षाला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे आलो आहे, अशी मागणी कैलाश कुमार यांनी केली आहे.