सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोग बरखास्त करा असं वक्तव्य केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसून एका सहीच्या आदेशानं निवडणुक आयोग बरखास्त करु शकतात, असा खोचक टोला लगावला आहे. घटनात्मक पद बरखास्त करा, अशी उद्धव ठाकरेंच वक्तव्य लोकशाही प्रणालीला मारक असुन एक पक्ष चालवणा-या प्रमुख नेत्यानं असं वक्तव्य करणं म्हणजे हास्यास्पद असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.
सातारा येथे माध्यमांशी शंभूराज देसाई बोलत होते. उध्दव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना नाव चोरलं, चिन्ह चोरलं. मात्र, ठाकरे हे नाव ते चोरु शकत नाहीत. यावर शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांचा खरपुस समाचार घेतला.
शंभूराज देसाई म्हणाले, घटनेत असलेल्या तरतुदी नुसार ज्याच्या बाजुन बहुमत आहे. या बाजुंची पडताळणी करुन तीन महिने सुनावणी घेवुन 78 पानांच निकालपत्र निवडणुक आयोगानं दिल आहे. यावर सुद्धा ठाकरे गटाची समाधान होत नसेल तर त्यांनी न्यायालयात जावं असं शंभुराज देसाई यांनी म्हणाले. आज ठाकरे गटानं आॅनलाईन पिटीशन दाखल केलं मात्र, आज कोर्टानं त्यांच ऎकुन सुद्धा घेलं नाही मात्र ठाकरे गटाला दाद मागण्यासाठी जे मार्ग आहेत ते त्यांनी वापरावेत असं शंभुराज देसाई म्हणाले आहेत.