हनुमानवाडीत तब्बल 48 वर्षानंतर निवडणूक : राष्ट्रवादीचेच वर्चस्व

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील
तब्बल 48 वर्षानंतर निवडणूक लागलेल्या हनुमानवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पुरस्कृत अंतर्गत तिरंगी लढत झाली. यामध्ये श्री. भैरवनाथ लोकनेते ग्रामविकास पॅनेलने लोकनियुक्त सरपंच पदासह 6 जागांवर विजय मिळवला आहे. पहिल्या लोकनियुक्त सरपंचपदी सुरेखा राजू अर्जुगडे यांनी 318 मते मिळवत 13 मतांनी यश मिळवले.

श्री. भैरवनाथ लोकनियुक्त ग्रामविकास पॅनेलमधून राधिका अभिजीत तळेकर 95 मते, अंजना सर्जेराव माने 94 मते, छाया हणमंत हत्ते 105 मते, मनीषा प्रविण नलवडे 91 मते, लोचना सुनिल अर्जुगडे 201 मते मिळाली. तर कालभैरवनाथ परिवर्तन पॅनेलमधून अतुल अरूण देसाई 236 मते, प्रदिप सुरेश धनवे 85 मते मिळवून विजयी झाले. हनुमान ग्रामविकास पॅनेलला एकही जागेवरती विजय मिळवता आला नाही.

हनुमानवाडी येथे तिरंगी लढत झाली. परंतु तिन्ही पॅनेल माजी सहकार मंत्री व कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांना मानणारी होती. या गावातील गेल्या 48 वर्षाची बिनविरोधची परंपरा यावर्षी मोडित निघाली. मात्र, लोकांनी लोकनियुक्त पॅनेललाच साथ देत सत्ता दिली. गावात निवडणूक पार पडल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रित येत विजयी सर्व उमेदवारांना एकत्रित आणण्यासाठी बैठक घेतली. तसेच पुढील निवडणुकीपासून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले.