कराड | विंग येथील विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत काॅंग्रेसच्या नाराज गटाच्या मदतीने जय हनुमान सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी 11- 2 असा विजय मिळवित सत्तांतर घडविले. विंग येथील सोसायटीत तब्बल 25 वर्षानंतर संत्तापालट झाली. जय हनुमान सहकार पॅनेलने विजय मिळवल्यानंतर गुलालाच्या उधळणीत मिरवणुक काढत विजयोत्सव साजरा केला.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विकास सेवा सोसायट्याच्या निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कराड दक्षिणमधील विभागात सोसायटीची मोठी सभासद संख्या आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे सर्वाचे लक्ष लागून राहते. यावेळची निवडणूक पहिल्यादाच अटीतटीची झाली असून चांगलीच गाजली. स्थानिक पातळीवर अॅड. उदयसिंह पाटील (दादा) – आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या विचाराच्या लक्ष्मीदेवी ग्रामविकास पॅनेल विरूध्द अतुल भोसले व नाराज काॅंग्रेस गट यांच्या विचाराच्या जय हनुमान सहकार पॅनेलमध्ये लढत झाली. काल मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी झाली.
काल झालेल्या निवडणुकीत 11 विरूध्द 2 च्या फरकाने जय हनुमान सहकार पॅनलने सत्तातंर घडविले. तब्बल 25 वर्षानंतर सत्ता ताब्यात घेतली. माजी सरपंच बबनराव शिंदे, उपसरपंच सचिन पाचुपते, प्रा. हेंमत पाटील, जयवंत माने, संपतराव खबाले, संपत खबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान सहकार पॅनेलच्या अनिल कणसे, आनंदा सोपान खबाले, जयवंत शिवाजी खबाले, राजेंद्र परशराम खबाले, रामदास सदाशिव खबाले, अनिल भिमराव पाटील, निवासराव शिंदे, अंकूश होगले, सिंधुताई पाटील, शोभा आण्णा माने, कृष्णत सोनावले यांनी विजय संपादन केला. राजेंद्र लक्ष्मण कुंभार, व सागर डाळे लक्ष्मीदेवी ग्रामविकास पॅनेलचे दोनच उमेदवार विजयी ठरले.