ठाकरे गटाला भाजपचा दणका! बेस्ट कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड

prasad lad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतीच उद्धव ठाकरेंना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बेस्ट कामगार संघटनेच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या अध्यक्षपदी ठाकरे गटाचे सुहास सामंत होते. मात्र आता हे पद भाजपच्या ताब्यात गेले आहे. त्यामुळे आता बेस्ट संघटनेवरील उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व कमी होऊ शकते. तब्बल 5 हजार कामगारांकडून प्रसाद लाड यांची एकमताने निवड झाली आहे.

सुरुवातीला आमदार गेले, नंतर पक्ष गेला, नंतर चिन्ह गेलं असे एकावर एक धक्के उद्धव ठाकरे यांना बसत आहेत. आता प्रकाश लाड यांची बेस्ट कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यामुळे हा देखील उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे. गेल्या अनेक काळापासून ही संघटना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. मात्र आता इथून पुढेही संघटना भाजपच्या नेतृत्वाखाली काम करेल. याचा फायदा आता आगामी निवडणुकांसाठी भाजपला होईल असे म्हटले जात आहे.

मुख्य म्हणजे, प्रकाश लाड यांच्याकडे महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त भविष्य निधी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे गट तयारीला लागला असताना तब्बल पाच हजार कामगारांचा संघ भाजपच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसू शकतो. त्याच उलट या संघटनेचे नेतृत्व बजावत भाजप आगामी महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला दणका देऊ शकतो.