नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून; विधानसभेत विधेयक मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भातील विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मंजूर करून घेतले. तसेच जनतेचं मत जाणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

या विधेकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. मात्र, सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड जनतेतूनच व्हावी का आमचा अजेंडा नाही, हि मागणी जनतेचीच होती असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले. आणि महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक 2022 संमत करून घेतलं. सरकारच्या या निर्णयामुळे नगराध्यक्ष आता थेट जनतेतून निवडला जाणार आहे.

दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. मी जर सक्षम नसतो तर एवढा मोठा करेक्ट कार्यक्रम केला असता का ? असं त्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. तसेच देवेंद्र और मै हू साथ साथ .. मेरा भी नाम हैं एकनाथ अशी आठवले स्टाईल हटके चारोळी त्यांनी म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.