राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढककल्या; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने या निवडणूका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस आहे त्या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील सध्याची पूरपरिस्थीती व विस्कळीत झालेले जनजीवन व वाहतूक व्यवस्थेमुळे परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडणे शक्य होणार नाही असे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

त्याअर्थी, राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन व वाहतूक व्यवस्था तसेच, सदर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या ● अधिकारात २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च / मा. उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्यावर दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.

ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणूका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.

सदर शासन आदेश महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२२०७१५१६२५०१०००२ असा आहे.

Leave a Comment