Electric Bike : देशातील पहिली Gear वाली Electric Bike सादर; किती आहे मायलेज?

Electric Bike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि (Electric Bike) डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. एकामागून एक अनेक अलेकट्रीक गाड्या बाजारात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अहमदाबाद स्थित टेक्नोलॉजी स्टार्ट-अप Matter कंपनीने देशातील पहिली गियर इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर केली आहे. ही गाडी चावी शिवायही सुरु करू शकता. खडबडीत रस्ते आणि रोडवे अशा दोन्ही मार्गांवर प्रवास करण्यासाठी या बाईकला डिझाइन करण्यात आलं आहे. कंपनीने या बाईकची किंमत अद्याप जाहीर केलेली नसली तरी गाडीचे बुकिंग लवकरच सुरू होणार असल्याचे म्हटले आहे.

Electric Bike

125-150 किलोमीटरचे मायलेज-

पॉवर आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल (Electric Bike) बोलायचे झाल्यास, मॅटर इलेक्ट्रिक बाइकमध्ये IP67 रेटिंगसह लिक्विड कूल्ड टेक्नोलॉजी आहे. गाडीला बाईक 5.0 kWh बॅटरी देण्यात आली आहे जी घरामध्ये सामान्य 5A सॉकेटमध्ये प्लग करून चार्ज केली जाऊ शकते. पॉवर पॅक भारतीय वातावरण आणि वापर परिस्थिती लक्षात घेऊन इन-हाउस विकसित केले गेले आहे आणि बॅटरी पॅक, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS), ड्राइव्ह ट्रेन युनिट (DTU), पॉवर कन्व्हर्जन मॉड्यूल आणि इतर सुरक्षा यांचा समावेश असलेले इंटीग्रेटेड युनिट आहे. ही बाईक पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. ही मोटर 10.5kW ची पॉवर आणि 520Nm टॉर्क जनरेट करू शकते. सिंगल चार्ज वे ही इलेक्ट्रिक बाईक 125-150 किलोमीटरचे मायलेज देऊ शकते.

Electric Bike

फीचर्स- (Electric Bike)

फीचर्सबद्दल बोलायचे झाले (Electric Bike) तर या बाईक मध्ये ऑटो रिप्लाय, म्युझिक, कीलेस ड्राइव्ह, स्टोरेज क्षमता, सात इंच स्क्रीन डिस्प्ले, ऍक्सीडेन्ट डिटेक्शन, ड्युअल डिस्क ब्रेक, जिओ-फेन्सिंग, कॉलिंग फीचर यांसारखी अनेक आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय यूजर इंटरफ़ेस (UI ) असा आहे कि यामध्ये रायडरला सर्व आवश्यक माहिती जसे की स्पीड, गियर स्थिती, राइडिंग मोड, नेव्हिगेशन, मीडिया आणि कॉल कंट्रोल यांसारखी माहिती देण्यात येते.

Electric Bike

बुकिंग कधी –

या इलेक्ट्रिक बाईकची किंमत अद्याप (Electric Bike) जाहीर केली नसली तरी बाईकसाठी 2023 च्या पहिल्या तिमाहीत बुकिंग सुरू होईल. त्याच दरम्यान, या बाइकची किंमत देखील उघड केली जाऊ शकते. त्याचबरोबर या बाईकची डिलिव्हरी एप्रिल 2023 मध्ये केली जाऊ शकते. ही इलेक्ट्रिक बाइक तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

हे पण वाचा :

Bajaj ची ही स्टायलिश बाईक दमदार इंजिन आणि उत्तम फीचर्ससह लॉन्च, Honda Shine ला देईल टक्कर

Royal Enfield ची क्रूजर बाइक लॉन्च; जाणून घ्या काय आहे खास

Ola Electric Bike : E- Scooter नंतर OLA आणणार इलेक्ट्रिक Bike; कधी होणार लॉन्च?

Jawa 42 Bobber : दमदार लूक आणि फीचर्ससह लॉन्च झाली Jawa 42 Bobber; पहा किंमत