पालघर : हॅलो महाराष्ट्र – पालघरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये बाईकवरुन जात असताना अचानक रस्त्यावरील वीज खांब पडल्यामुळे (electric poll falls on running bike) दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हि घटना पालघर मधील बोईसर-नवापूर रोड येथील कोलवडे या ठिकाणी घडली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाचे नाव योगेश पागधरे आहे. गंभीररीत्या जखमी झालेल्या योगेशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे महावितरण विभागाचा भोंगळ कारभार (electric poll falls on running bike) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
चालत्या बाईकवर विजेचा खांब पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी pic.twitter.com/CTaDZnbMH5
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 9, 2022
धावत्या बाईकवर वीज खांब पडल्यामुळे (electric poll falls on running bike) या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वीज खांब हटवेपर्यंत बोईसर-नवापूर रोडवरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, वीज खांब पडल्याचे (electric poll falls on running bike) समजताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विजेचा खांब पडल्यानं (electric poll falls on running bike) याचा परिणाम वीज वितरणावर झाला आहे. सुदैवाने यामध्ये त्या तरुणाचा जीव वाचला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातदेखील अशीच घटना घडली होती. यामध्ये पुण्यातील दोघा तरुणांच्या चालत्या बाईकवर झाड कोसळलं होतं. या दुर्घटनेत दोघाही तरुणांना आपला जीव गमवावा लागला. सुदैवाने या दुर्घटनेत तरुणाचा जीव वाचला आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर