एसटी संपामुळे विद्यार्थीनीचा हकनाक गेला बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील एसटी कामगार संपावर असल्याने राज्यातील एसटी बसेस बंद आहेत. या संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. या संपामुळे जळगावातील विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यू झाला आहे. धावत्या रिक्षेतून तोल गेल्याने एक 17 वर्षीय विद्यार्थिनी रिक्षातून खाली पडली. तेव्हा तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिला उपचारासाठी जळगावला नेताना तिचा अर्ध्या वाटेतच मृत्यू झाला. हि घटना गुरुवारी घडली आहे. तृप्ती भगवान चौधरी असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. एसटी बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने महाविद्यालयात ये जा करत होती.

अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती तृप्ती
मृत तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न.ह.रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेला शिकत होती. ती एरवी एसटीने प्रवास करायची मात्र गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु असल्याने एसटी बंद आहे. त्यामुळे तृप्ती रिक्षानेच महाविद्यालयात ये जा करत होती. घटनेच्या दिवशीसुद्धा ती ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली होती. यानंतर कॉलेज सुटल्यानंतर तृप्ती मैत्रिणींसोबत शेलवड येथील घरी ऑटोरिक्षाने निघाली. यावेळी ती प्रवासी वाहतूक करणार्‍या खाजगी रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजूने बसली होती.

तोल गेल्याने दोघी मैत्रिणी रिक्षातून पडल्या
प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रिण रोहिणी राजेंद्र धनगर या दोघी धावत्या रिक्षातून खाली पडल्या. यामध्ये तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मत तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. यानंतर जळगावला नेत असताना वाटेतच तृप्तीचा मृत्यू झाला.

Leave a Comment