शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? मग एलोन मस्क यांचा ‘हा’ कानमंत्र ऐकाच

Elon Musk
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हीही जर शेअर मार्केट मध्ये पॆशांची गुंतवणूक करत असाल तर जगातली श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांनी दिलेला एक सल्ला नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल. एलोन मस्क यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक कधी आणि कशी करायची आणि शेअर्स ची विक्री कधी करावी याबाबत त्यांनी काही सल्ले दिले आहेत.

एलोन मस्क म्हणतात, ज्या कंपन्यांची उत्पादने आणि सेवांवर तुमचा विश्वास आहे अशा कंपन्यांचे स्टॉक खरेदी करा. आणि त्या कंपनीचे उत्पादन किंवा सेवा खराब आहे, असे वाटत असेल तर लगेच त्याची विक्री करा. कोणत्याही परिस्थिती मध्ये आपल्याला घाबरण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितल. 2022 फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती $268.2 अब्ज आहे.

मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी त्यांचे काही स्टॉक विकले आहेत. यूएस मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला दिलेल्या माहितीनुसार, एलोन मस्कने या करारासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी टेस्लाचे $8.5 अब्ज किमतीचे शेअर्स विकले आहेत. त्यांनी कंपनीचे 96 लाख शेअर्स $822.68 ते $999.13 या श्रेणीत विकले. तसेच आता टेस्लाचे आणखी शेअर्स विकण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.