Wednesday, June 7, 2023

एलन मस्कची कंपनी Tesla चे मुंबईत होणार ऑफिस ! युनिट सुरु करण्याबाबतही महाराष्ट्र सरकारशी होतेय चर्चा

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला (Tesla) चे ऑफिस मुंबई येथे सुररू होणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले की,”टेस्लाने अनेक अनेक राज्यात सर्वे केला आहे आणि ते म्हणतात की, महाराष्ट्रातील उद्योगाचे वातावरण खूप उत्साहवर्धक आहे. अशा वेळी कंपनी महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”

महाराष्ट्रातील उद्योगाच्या वातावरणाला प्रोत्साहन देणे
सुभाष देसाई यांनी आपल्या उत्तरात सांगितले की,”टेस्ला कंपनी मुंबईतही ऑफिस सुरू करणार आहे. देशात कंपनीच्या कोणत्या मॉडेलला अधिक मागणी असेल हे शोधल्यानंतर कंपनी येथे प्रॉडक्शन युनिट सुरू करणार आहे. म्हणूनच त्यांनी बेंगळुरु येथे कंपनी हलविली असे म्हणणे चुकीचे आहे” असे त्यांनी आवर्जून सांगितले. देसाई म्हणाले की,”टेस्ला कंपनी म्हणते की, महाराष्ट्रातील उद्योगाचे वातावरण प्रोत्साहित करते, आम्हाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. हा प्रकल्प कोठेही गेला नाही.”

देशी आणि परदेशी ऑटोमोबाईल हब आहे
देशांतर्गत आणि परदेशी ऑटोमोबाइल उत्पादकांसाठी महाराष्ट्र आधीच एक आवडते ठिकाण आहे. पुणे हे ऑटोमोबाईलचे प्रमुख हब आहे. देसाई म्हणाले की,”टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसाठी महाराष्ट्रात रिटेल आउटलेटस सुरू करण्यास उत्सुक आहे.”

कर्नाटकात पहिले मॅन्युफॅक्चरिंग युनिट
टेस्ला कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे पहिले मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापित करेल. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी नुकतेच ही माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विधानानुसार अमेरिकन कंपनी टेस्ला कर्नाटकमध्ये इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चरिंग युनिट उघडेल. ते पुढे म्हणाले की,”राज्यातील तुमकूर जिल्ह्यातही औद्योगिक कॉरिडोर तयार केला जाईल. सुमारे 7725 कोटी खर्च होणार असून 2.8 लाख लोकांना रोजगार मिळेल.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.