मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करून त्यांना पोलीस खात्यातून काल बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर पोलीस दलात अनेक बदल पाहायला मिळाले. अनेक जणांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची देखील बदली करण्यात आली. आता मात्र मॅटकडून या बदलीला स्थगिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी म्हणजेच ६ मे रोजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियातील जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात करण्यात आली होती. मात्र दया नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे दया नायक हे आपल्या मुंबईतील पदावर कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार आणि मुंबई व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझे याला अटक करण्यात आली होती. मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास जी ATS टीम करत होती. त्यापैकी जुहू ATS टीमचे नेत्रृत्व हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक करत होते. मॅटकडून देण्यात आलेल्या स्थगितीनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना दिलासा भेटला आहे.