Earth : पृथ्वीचा शेवट कसा होईल ??? अखेर शास्त्रज्ञांनी शोधून काढले उत्तर

EARTH
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earth : पृथ्वीचा शेवट कसा होईल ??? अशा प्रश्न कधी आपल्या मनात डोकावला आहे का ??? आपलीकडे साधारणतः असे मानले जाते कि, कधीतरी अंतराळातून एखादा मोठा खडक किंवा उल्का पृथ्वीला धडक देईल. त्यानंतर पृथ्वीचे अनेक तुकडे होऊन ती नष्ट होईल. मात्र प्रत्यक्षात या प्रश्नाचे अचूक उत्तर शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञही बऱ्याच काळापासून संशोधन करत होते. याचे गूढ उकलण्यात आता शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. आपल्या या नवीन संशोधनात शास्त्रज्ञांना बाह्य ग्रह म्हणजेच एक्सोप्लॅनेटवरून पृथ्वीचा शेवट कसा होईल याचे संकेत मिळाले आहेत.

How to backup life on Earth ahead of any doomsday event

या संशोधनानुसार शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या पृथ्वीचे अस्तित्व हे सूर्यामुळे आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, जोपर्यंत सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळत राहील तोपर्यंत आपला ग्रह अस्तित्वात राहील. मात्र, या नवीन संशोधनात शास्त्रज्ञांनी एक्सोप्लॅनेट आपल्या तार्‍याकडे टक्कर देण्यासाठी जात असल्याचे पाहिले गेले. हळूहळू या एक्सोप्लॅनेटची कक्षा संपत असल्याचे यावेळी दिसून आले आहे. द एस्ट्रॉनॉमिकल जर्नल लेटर्सच्या रिपोर्ट्सनुसार, ग्रहांचे जीवनचक्र समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून हे संशोधन मैलाचा दगड ठरणार आहे.  Earth

Life on Earth may end earlier than previously thought, here's why

ग्रहाच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी लागला वेळ

संशोधकांना याआधीच कळून आले की, एक्सोप्लॅनेट आपल्या ताऱ्यांमध्ये विलीन होऊन नष्ट होतात. याबाबत आत्तापर्यंत फक्त सिद्धांतिक विचार करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत एकही ग्रह नष्ट झालेला पहिला गेला नव्हता. अशा परिस्थितीत या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना ही संपूर्ण घटना पाहण्याची संधी मिळाली आहे. 2009 मध्येच NASA ने दुर्बिणीच्या मदतीने केप्लर 1658B हा बाह्य ग्रह आपल्या तार्‍याकडे सरकत असल्याचा शोध लावला होता. मात्र, या बाह्य ग्रहाच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी वैज्ञानिकांना जवळपास एक दशकाचा कालावधी लागला. Earth

How The Earth Will End? - YouTube

केप्लर 1658B हा गुरूसारखाच आहे

शास्त्रज्ञांच्या मते, गुरु आणि या बाह्य ग्रह हे जवळपास सारखेच आहेत. या दोघांचे वजन आणि आकार जवळपास एकसारखेच आहे. तसेच या दोघांमधील फरक इतकाच आहे की, हा बाह्य ग्रह आपल्या ताऱ्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या दोघांमधील अंतर सूर्य आणि बुध यांच्यातील अंतराच्या 8 व्या भागाइतकेच राहिले आहे. या प्रकारचा एक्सोप्लॅनेट कक्षा संपल्यावर आपल्या ताऱ्यावर आदळून नष्ट होतो. शास्त्रज्ञांच्या मते, या एक्सोप्लॅनेटची कक्षा दरवर्षी कमी कमी होत आहे. तसेच हा एक्सोप्लॅनेट आपल्या सूर्याकडे अत्यंत संथ गतीने जात आहे. एक्सोप्लॅनेटची कक्षा दरवर्षी 131 मिलीसेकंद वेगाने कमी होत असल्याचे यावेळी दिसून आले आहे. Earth

A billion years from now, a lack of oxygen will wipe out life on Earth

बदलतो ग्रहांचा आकार

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, कोणताही ग्रह आणि त्याचा सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्ती त्यांच्या आकारात बदल घडवून आणते. या बदलामुळे प्रचंड ऊर्जाही बाहेर पडते. गुरू ग्रह आणि त्याचे चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळेही अशीच ऊर्जा निर्माण होत असल्याचे वैज्ञानिकांना यावेळी आढळून आले आहे. Earth

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nasa.gov/

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर