Tuesday, February 7, 2023

अभियंता तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

औरंगाबाद – शहरातील चिकलठाणा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करणाऱ्या अभियंता विवाहितेने पदंपुरा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. या तरुणीचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मेघना अंकुश सूर्यवंशी (23) असे त्याचे नाव आहे.

बीडच्या परळी तालुक्यातील मेघनाचा अंकुश सूर्यवंशी सोबत 16 फेब्रुवारी 2019 रोजी विवाह झाला होता. वाळूजमधील एका कंपनीत अंकुश मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे. लग्नानंतर काही दिवसातच या दाम्पत्याने मध्ये वाद सुरू झाले. अंकुश चे कंपनीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मेघना यांना मिळाली होती. गुरुवारी रात्री सात वाजता अंकुश घरी आला तेव्हा त्यास मेघना यांनी सिलिंग फॅनला साडीने गळफास घेतल्याचे दिसले. तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

- Advertisement -

नातेवाईकांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यासमोर ठेवला मृतदेह –
पतीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह थेट वेदांत नगर पोलिस ठाण्यात समोर आणून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास वरिष्ठ निरीक्षक गणपत दराडे यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले. पतीवर तपासादरम्यान गुन्हा नोंदवण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले. त्यानंतर मात्र नातेवाईक मृतदेह घेऊन गेले. मृत विवाहितेवर बीड जिल्ह्यातील माहेरी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.