मनपाच्या नगररचना विभागातील प्रभारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात; नागरिकांनी फोडले फटाके

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
औरंगाबाद – महापालिकेतील बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेला नगररचना विभागातील प्रभारी अभियंता तथा गुंठेवारी कक्ष प्रमुख संजय चामले याला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तक्रारदार बिल्डरकडे लेआऊट मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिल्या हप्त्यापोटी 3 लाख स्वीकारताना पकडण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेतील भ्रष्टाचाराचे कुरण असलेल्या नगररचना विभागातील प्रभारी अभियंता म्हणून संजय चामले कार्यरत होता. मागील काही दिवसांपासून गुंठेवारी विभागाचा कक्षा प्रमुखही करण्यात आले होते. त्यांच्याविषयी नागरिकांच्या प्रचंड तक्रारी होत्या. मात्र राजकीय वरदहस्तामुळे त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येत नव्हती. एका बिल्डर कडून एका कामासाठी दहा लाख रुपये घेतले होते. त्यानंतर ही लेआउटच्या तीन फाईल मंजुरीसाठी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. पहिल्या हप्त्यापोटी तीन लाख रुपये देण्याचे ठरले, मात्र तक्रारदारास पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सातारा परिसरातील चांगले याच्या घरीच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना चांगले यास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कामगिरी अधीक्षक डॉ. खाडे यांच्या मार्गदर्शनात उपाधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या पथकाने केली.
सातारा-देवळाईत फुटले फटाके – 
लाच घेताना पकडले चामले हा गुंठेवारी विभागाचा प्रमुख होता. सातारा देवळाई परिसरातील नागरिकांच्या गुंठेवारीचे नियमितीकरण करण्यासाठी चांगले कडून नागरिकांची प्रचंड आर्थिक पिळवणूक करण्यात येत होती. त्याला लाच घेताना पकडल्याची माहिती मिळताच नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. नागरिकांमध्ये चामलेच्या विविध विषयांची चर्चाही करण्यात येत होती.

Leave a Comment