हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सध्या अष्टपैलू खेळाडू Ben Stokes सांभाळत आहे. आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघासोबत आहे. गेल्या महिन्यातच स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, असे असले तरीही तो टी-20 मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे. तसेच संघाचे वेळापत्रक पाहूनच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
31 वर्षांचा असलेला Ben Stokes सध्या क्वचितच या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसून येतो आहे. सध्या आपण कसोटी क्रिकेटला जास्त महत्त्व देत असून जगभरातील फ्रँचायझी क्रिकेटमध्ये या वेळापत्रकानुसारच खेळणार असल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच कसोटी मालिका असेल तर त्यामध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करायला आवडेल, असेही Ben Stokes ने सांगितले आहे.
प्राइम व्हिडीओकडून आयोजित करण्यात आलेल्या एका मीडिया कॉन्फरन्समध्ये Ben Stokes ने सांगितले कि, ‘इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणून आमचे वेळापत्रक भरगच्च आहे. यावरून असे दिसून येते की आम्ही वर्षभर खेळणार आहोत. एकतर बाकीचे संघ इंग्लंडमध्ये खेळायला येत आहेत किंवा आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी टूर करणार आहोत. सर्व काही वेळापत्रकावर अवलंबून असेल. मात्र मी स्पष्ट केले आहे की कसोटी क्रिकेट नेहमीच माझे प्राधान्य राहिले आहे. तसेच माझे सर्व निर्णय कसोटी सामन्यांवर आधारित असतील.
Ben Stokes ने पुढे सांगितले कि, ‘आता कर्णधार असल्याने माझ्यावरही जबाबदारी आहे. होय, आता कोणत्याही विदेशी लीगसाठीची माझी बांधिलकी ही आमच्या वेळापत्रकावर आधारित असेल. तुम्हाला माहितीच असेल कि, मी 4 वर्षे आयपीएल खेळलो आहे. प्रत्येक वेळी मी तिथे गेलो आहे आणि मला खूप प्रेम देखील मिळाले आहे. जगातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि काही सर्वोत्तम प्रशिक्षकांसोबत काम करण्याच्या संधीचा एक भाग बनण्यासाठी ही एक अद्भुत स्पर्धा आहे. यामध्ये सहभागी होणे हा एक मस्त अनुभव आहे.’
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cricbuzz.com/profiles/6557/ben-stokes
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ पेपर कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात दिला 160 टक्के नफा !!!
PNB च्या ग्राहकांना आता FD वर घेता येणार कर्ज !!! ‘या’ नवीन सुविधेबाबत जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजच्या किंमती तपासा !!!
PIB Fact Check : SBI ने ट्रान्सझॅक्शनच्या नियमात केले बदल, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या