इंग्लंड-विंडीज कसोटी सामन्यात खेळाडूंनी मैदानावर गुडघे टेकून केला वर्णद्वेषाचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साऊथॅम्प्टन । कोरोना काळात क्रिकेट विश्व गेले काही महिने ठप्प होते मात्र , आता इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना होत आहे. साऊथॅम्प्टनमध्ये हा कसोटी सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे खेळाडू तसेच अम्पायर्स यांनी गुडघे जमिनीला टेकले. या सर्वांनी मैदानावर वर्णभेदाच्या विरोधात ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीचे समर्थन केले. अमेरिकेत पोलीस कोठडीत जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर वर्णभेद विरोध जगभर सुरू झाला.

या कसोटी सामन्याचा पहिला बॉल फेकण्यापूर्वीच क्षेत्ररक्षण करणारा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू गुडघ्यावर बसला होता. इंग्लंडचे खेळाडूही गुडघ्यावर बसले. दोन्ही संघांनी त्यांच्या जर्सीच्या कॉलरवर ब्लॅक लाइव्ह्ज मॅटरचा लोगो लावला होता. आयसीसीने त्यांच्या ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 17.4 षटकांचा सामना झाला. पावसामुळे खेळ थांबवावा लागला.

पाऊस थांबल्यावर पुन्हा खेळ सुरू झाला. बर्न्स आणि जो डेनली यांनी इंग्लंडची धावसंख्या 35/1 वर आणली. परंतु त्यानंतर कमी प्रकाशामुळे खेळ पुन्हा एकदा थांबविण्यात आला आणि टी ब्रेक झाला. बर्न्स 20 आणि डेनली 14 रनवर खेळत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”