पाचगणीत नगसेवकांची फितुरी; नगराध्यक्षाची कास्टींग मतावर पुन्हा मारली बाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनीधी | शत्रुच सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितुर मोजा शिवप्रभुच्या युद्धनितीचा प्रत्यय पाचगणी नगरपालीकेच्या विषेश सर्वसाधारण सभेत आला. नगराध्यक्ष लक्ष्मी कर्राहडकर याच्याकडे पाच नगरसेवक असताना सभेच्या विषयांना मंजुरी करीता अल्प नगसेवकांच बळ असताना नगराध्सक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी विषय मंजुरी करीता मतदान घेण्यात आले. यामतदान प्रक्रियेत समसमान मते नगराध्यक्ष व विरोधी गटाला पडली. मात्र नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर कास्टींग मताचा वापर करत सभागृहात सर्व विषयांना मंजुरी करुन मिळाली. मात्र यादरम्यान विरोधकाच्या मध्ये फंदफितुरी झाल्याने सभागृहात नगराध्यक्षा समसमान मते मिळाल्याचे लपुन राहीले नाही.

विरोधकानी नगराध्सक्षा लंक्ष्मी कर्हाडकर यांना नगरपालीकेच्या कारभारात लक्ष करत जोरदार मोर्चेबाधणी केली होती. गत काही महिन्यापूर्वी नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर याच्यावर अविश्वास ठराव देखील विरोधात केलेल्या १३ नगरसेवकानकडुन पारीत करण्यात आला होता. मात्र नगरविकास खात्याच्या सचिवानकडुन तो ठराव फेटाळण्यात आला होता. पाचगणीत पुन्हा लक्ष्मी कर्हाडकर यांचा नगराध्यक्षपद सुरक्षित झाले. मात्र पाचगणीत नगरपालीकेच्या सभेत विरोधातील १३ नगरसेवकानपैकी चार नगरसेवकांनी फितुरी केल्याने पुन्हा लक्ष्मी कर्हाडकर यांच बलाबल सभागृहात समसमान झाले आहे.

नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांचा जुनाच गट जो विरोधकांच्याकडे वळला होत तो पुन्हा “या चिमण्यानो परत फीरा. “ अशी चर्चा पाचगणीत पुन्हा सुरु झाली आहे. नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांना सभागृहात मतदान केल्याने भविष्यात राजकीय समिकरण बदलावर का ? याबाबात अंदाज बाधले जात आहे. विरोधकांनपैकी कोणाकोणाला रसद मिळाली याबाबत चर्चा व्हायला सुरवात झाली आहे. लक्ष्मी कर्हाडकर पाचगणीत सर्वसाधारन सभेत कास्टीग मताचा वापर विषय मंजुरी करीता करावा लागतो हे पण लोकनिर्वाचीत नगराध्यक्षाची झालेली त्रेधात्रिपीठ विरोघकांनी उभारलेले ताकतीचा अंदाजा येतो. मात्र शत्रुच सैन्य मोजण्यात फितुरी झाल्याने पुन्हा पाचगणीत राजकीय समिकरण बदललं आहे हे मात्र नक्की.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment