हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यात ओसरत असलेल्या कोरोनाच्या लाटेमुले दोन लशींचे ढोस घेतलेल्यांना निर्बंधात सूट देण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील लोकल बंद ठेवण्यात आली. यावरून आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहले आहे. “सर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केले आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे,
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यामुळे आता राज्यसरकारकडून हळूहळू निर्बंधात शिथिलता दिली जात आहे. मात्र, मुंबईतील लोकलबाबत राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना सूट देण्यात आली नव्हती. त्याबाबत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवले असून त्यात त्यांनी मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे., असे म्हंटले आहे.
मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे.@CMOMaharashtra pic.twitter.com/UfFGDI8uau
— Raj Thackeray (@RajThackeray) July 22, 2021
राज ठाकरे पत्रात म्हंटले आहे कि, महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीने पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केले आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहिलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल.