हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NPS : भविष्याची चिंता प्रत्येकालाच सतावत असते. त्यासाठी प्रत्येक जण काही ना काही खटपट करत असतो. आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेऊन अनेक लोकं आधीपासूनच रिटायरमेंटसाठीचे प्लॅनिंग करतात. रिटायरमेंट किंवा पेन्शनसाठी दोन सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. त्यातील पहिला म्हणजे एक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) तर दुसरा म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS). आता प्रश्न असा उपस्थित होतो की या दोघांमध्ये सर्वांत चांगला पर्याय कोणता ???
EPFO बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये गेल्या आर्थिक वर्षांत म्हणजेच मार्च 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधी मध्ये 1.11 कोटी सदस्य जोडले गेले तर NPS मध्ये 93.6 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केले. अनेक कंपन्यामध्ये EPF ची सुविधा दिली जाते. तर NPS मध्ये इन्कम टॅक्स बेनेफिट्स मिळतात. चला तर मग या दोघांपैकी जास्त फायदा कशात मिळेल हे समजून घेऊयात…
रिटायरमेंटसाठीची बचत
या दोन्ही द्वारे आपल्याला रिटायरमेंटसाठी बचत करता येईल. EPF मध्ये अनेक वर्ष पैसे जमा केल्यानंतर रिटायरमेंटच्या वेळी मोठी रक्कम जमा होईल. EPF मध्ये दरवर्षी मिळणाऱ्या रिटर्नवर भर असतो. त्याच्या रिटर्नची गॅरेंटी ही भारत सरकार कडून दिली जाते. यामध्ये आपल्याला रिटायरमेंटच्या वेळी एकरकमी रक्कम मिळते.
NPS चा भर कंपाउंडिंगवर
एनपीएसमध्ये ठेवलेले आपले पैसे हे इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये गुंतवले जातात. यामध्ये आपले दर महिन्याचे योगदान हे कम्पाउंडिंग होऊन ते रिटायरमेंटपर्यंत मोठ्या रकमेत रूपांतरित होतील. त्यामुळे याद्वारे आपल्याला चांगली पेन्शनही मिळू शकेल. इथे हे लक्षात घ्या कि, EPF ही कर्मचारी लाभ योजना आहे ,त्यामुळे त्याचा लाभ हा फक्त नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाच मिळेल. मात्र इतर कोणत्याही व्यवसायातील व्यक्तींना आपल्या रिटायरमेंटसाठी बचत करण्यासाठी NPS वापरता येईल.
NPS चा 75% भाग इक्विटी मध्ये
एनपीएसमध्ये, आपले किती पैसे इक्विटीमध्ये गुंतवले जातील हे आपल्याला ठरवता येईल. मात्र त्याची जास्तीत जास्त लिमिट हे मासिक योगदानाच्या 75 टक्के असेल. EPF मध्ये आपले पैसे कुठे गुंतवले जातील यावर आपला कंट्रोल नसतो. मात्र इक्विटीमध्ये फंडाच्या 5 टक्के ते 15 टक्के देखील गुंतवणूक केली जाते.
गुंतवणूक कशी करावी ???
“आम्ही ग्राहकांना शक्य असेल तर दोन्हीमध्ये थोड्या थोड्या गुंतवणूक करण्यास सांगतो,” असे मार्केटमधील तज्ञ म्हणतात. EPF हे एक गॅरेंटेड उत्पन्न देणारे असल्याने रिटायरमेंट नंतरच्या खर्चांसाठी ते चांगले उपयोगी ठरते. त्याच वेळी, इतर अतिरिक्त खर्च किंवा पेन्शनसाठी NPS हा एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होते.
कर सवलत
EPF आणि एनपीएसया दोन्हींमध्ये कर सवलत देखील मिळेल. या दोन्हीमध्ये आपल्याला गुंतवलेल्या रकमेसाठी, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करपात्र उत्पन्नातून 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळवता येईल. एनपीएससाठी, तुम्हाला कलम 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://epfindia.gov.in/
हे पण वाचा :
EPFO : मोदी सरकार नोकरदारांना लवकरच देणार गुड न्यूज; PF खातेधारकांना होणार फायदा
PM KISAN : 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत ??? यामागील कारणे जाणून घ्या
Multibagger Stock : गेल्या सहा महिन्यांत ‘या’ शेअर्समध्ये झाली 645 टक्क्यांची जोरदार वाढ !!!
Bank FD : ‘या’ सरकारी बँकेने वाढवले आपल्या FD चे व्याजदर !!!
Sologamy : मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!जाणून घ्या संपूर्ण प्रकरण