हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) नोकरदारांसाठी अनेक सुविधा पुरवल्या जातात. EPFO ही जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था आहे. सध्या त्यांच्याकडे 24.77 कोटी सदस्यांची खाती आहेत. EPFO च्या नियमांनुसार, कंपनी आणि कर्मचार्यांच्या वतीने 12-12 टक्के बेसिक सॅलरी आणि DA दर महिन्याला PF खात्यात जमा करावा लागतो. यामध्ये पगार मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत पैसे जमा करण्याचा नियम आहे.
जेव्हा कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे जमा केले जातात तेव्हा ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना मेसेज पाठवला जातो. याशिवाय EPFO वेबसाइटवर लॉग इन करून देखील कर्मचाऱ्यांना ते तपासात येईल.
मात्र जर एखाद्या वेळेस कंपनीकडून पीएफचे पैसे कापले गेले तर आणि EPFO कडून जास्त अपडेट मिळत नसेल तर आता घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण आता असे अनेक मार्ग उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपल्या पीएफचे पैसे पीएफ खात्यात जमा करता येतील.
पैसे जमा केले नसतील तर अशाप्रकारे करा तक्रार
याबाबत तक्रार करण्यासाठी, सर्वांत आधी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर Register Grievance वर जा आणि त्यावर क्लिक करा. आता PF मेंबर, EPS Pensioner, Employer यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. यामध्ये PF मेंबर निवडा आणि UAN क्रमांक आणि सिक्योरिटी कोड टाका. आता Get Details या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Get OTP वर जा. यानंतर आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल. आता तक्रार दाखल करता येईल.
होऊ शकेल कायदेशीर कारवाई
जर एखाद्या कर्मचाऱ्याने याबाबत तक्रार केल्यास EPFO कडून कंपनीकडे चौकशी केली जाईल. मात्र जर कंपनीने कर्मचार्यांचे पैसे कापले आणि ते ईपीएफओकडे जमा केले नाहीत हे सिद्ध झाले तर अशा परिस्थितीत कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
EPFO विषयी जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही भारतातील राज्य-प्रोत्साहित अनिवार्य अंशदायी पेन्शन आणि विमा योजना देणारी संस्था आहे. सभासद आणि आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे. जीच्या व्याजदराबाबतचा निर्णय हा CBT द्वारे घेतला जातो.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लॅन, त्याविषयी जाणून घ्या
Flight Booking : ‘या’ टिप्स वापरून स्वस्तात बुक करा फ्लाईट्सचे तिकीट !!!
Canara Bank चा ग्राहकांना धक्का, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार
Hallmarking of Gold : सोन्याच्या हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल, आजचा भाव पहा