हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (EPFO) नियम आहे की नियोक्ता त्याच्या कर्मचाऱ्याच्या मूळ पगारातून 12 टक्के रक्कम कापून त्याच्या पीएफ खात्यात टाकतो. यासोबतच त्याच्याकडील कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यातही हीच रक्कम जमा केली जाईल.
नियोक्त्याने केलेल्या योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पेन्शन फंडात जाते, तर उर्वरित रक्कम त्याच्या पीएफ खात्यात जाते. मात्र नियोक्त्याने दरमहा हे योगदान देणे खूप महत्वाचे आहे. जर कर्मचाऱ्याला त्याच्या EPFO खात्याद्वारे त्याचा मालक पैसे टाकतो आहे की नाही हे देखील तपासता येते. तसेच EPFO कडून कर्मचाऱ्याच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एसएमएसही येतो.
मात्र जर आपला नियोक्ता दरमहा पीएफ खात्यात पैसे टाकत नसेल तर काय करता येईल ??? त्या विरोधात कुठे तक्रार दाखल करावी ??? असा प्रश्न उदभवतो.
याबाबत तज्ञ सांगतात कि …
याबाबत गुंतवणूक आणि कायद्यातील तज्ज्ञ असलेले सचिन श्रीवास्तव सांगतात कि,” कर्मचारी अशा नियोक्त्याविरुद्ध EPFO कडे तक्रार दाखल करू शकतो. आपल्या तक्रारीनंतर, EPFO या प्रकरणाची चौकशी करेल आणि नियोक्त्याला आपल्या PF खात्यात निश्चित रक्कम जमा करण्याबाबत सूचना देईल. जर नियोक्त्याकडून तुमच्या पगारातून कपात केली जात असेल, आणि तो पैसे पीएफ खात्यात जमा करत नसेल, तर ते फौजदारी प्रकरण ठरेल आणि अशा प्रकरणात कठोर कारवाई देखील होऊ शकेल.
अशा प्रकरणात EPFO कडून पोलिस तक्रार देखील केली जाऊ शकते. नियोक्त्याने चूक केल्यास, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना त्याच्यावर कर्मचाऱ्याची संपूर्ण पीएफ रक्कम वसूल करण्यासाठी दबाव आणेल. इतकेच नाही तर पोलिसात तक्रार आल्यास मालकावर फौजदारी कलमांतर्गत गुन्हाही नोंदवला जाऊ शकतो. इथे हे जाणून घ्या कि, संस्थेला EPFO च्या कलम 14-B अंतर्गत नुकसानभरपाई वसूल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पगार दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत पीएफमध्ये योगदान देणे आवश्यक
EPFO च्या नियमांनुसार, ज्या महिन्यात पगार दिला जातो त्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सर्व नियोक्त्यांकडून पीएफ खात्यात योगदान देणे बंधनकारक आहे. जर एखादा नियोक्ता जुलै महिन्याचा पगार 1 ऑगस्टला देत असेल तर त्याला त्या महिन्याच्या पीएफची रक्कम ही 15 ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावी लागेल.
नियोक्त्यांवरील फास घट्ट करण्यासाठी सरकारने 2021 च्या अर्थसंकल्पात कडक तरतूदी केल्या आहेत. या नवीन नियमांनुसार, जर नियोक्ता पीएफ खात्यात वेळेवर योगदान देऊ शकत नसेल, तर त्याला कपातीचा दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. याचा अर्थ नियोक्त्याला या रकमेवर कोणतीही कर सवलत दिली जाणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द !!!
Samsung Galaxy Z Fold 4 : Samsung ने लॉन्च केला 2 डिस्प्लेवाला नवा मोबाईल; पहा फीचर्स आणि किंमत
Gold Price Today : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर तपासा
Kotak Mahindra Bank च्या एफडीवरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा