हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO कडून आपल्या खातेधारकांना नॉमिनेशन करण्यास सांगितले जाते. असे केल्याने भविष्यात क्लेम करण्यात कोणतीही अडचण येत नाही. यामध्ये जर खातेदाराचा मृत्यू झाला आणि त्याने आधीच आपला नॉमिनी घोषित केला असेल तर नॉमिनीला फारसा त्रास न होता पैसे मिळतात. म्हणून, EPF सदस्याने नॉमिनेशन करणे फायदेशीर ठरते. इथे हे जाणून घ्या कि, जरी एखाद्या सदस्याने नॉमिनेशन केले नसेल तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना फॉर्म 20 भरून क्लेम करता येतो.
पैसे कोणाला मिळतील ???
जर एखाद्या नॉमिनेशन न केलेल्या EPF खातेधारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांना पैसे दिले जातात. EPF मध्ये याबाबत स्पष्ट नियम तयार केला गेला आहे. यानुसार, जरी ग्राहकाने नॉमिनेशन केले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला तर PF मध्ये जमा असलेले त्याचे पैसे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान प्रमाणात विभागले जातात. कुटुंबातील सदस्यांमध्ये पती/पत्नी, मुले (विवाहित किंवा अविवाहित), आश्रित पालक, ग्राहक महिला असल्यास ग्राहकाच्या पतीचे आश्रित पालक, ग्राहकाच्या मुलाची विधवा पत्नी आणि तिची मुले यांचा समावेश होतो. EPFO
फॉर्म 20 भरावा
मात्र पैसे मळ्वण्यासाठी EPF खातेधारकाच्या कुटुंबाला फॉर्म 20 भरावा लागेल. तसेच नियमानुसार कुटुंबातील ज्या सदस्यांना पैसे मिळणार आहेत त्यांची नावे द्यावी लागतील. ज्या कंपनीत EPF सदस्य काम करत होता त्या कंपनीकडून कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्यात येईल. मात्र जर काही कारणास्तव कंपनी ही माहिती देऊ शकत नसेल किंवा कंपनी बंद झाली असेल, तर कुटुंबातील सदस्यांची लिस्ट कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून सादर करावी लागेल. यासोबतच डेथ सर्टिफिकेटची फोटोकॉपी आणि कॅन्सल केलेला चेक देखील फॉर्म 20 सोबत जोडावा लागेल. EPFO
लवकरात लवकर क्लेम करा
अशा वेळी क्लेम दाखल करण्यास उशीर करू नये. यामध्ये EPFO कडे कुटुंबाकडून जितक्या लवकर फॉर्म 20 सबमिट केला जाईल, तितक्याच लवकर क्लेम देखील मिळेल. साधारणपणे, EPF आयुक्त सर्व आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर एका महिन्यात क्लेम देतात. यामध्ये जर सदस्याचे PF खाते EPFO ऐवजी खाजगी ट्रस्टकडे असले तरी या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. EPFO
जर ग्राहकाने मृत्युपत्र तयार केले असेल तर क्लेम मिळण्यास थोडा जास्त वेळ लागू शकेल. कारण यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट द्यावे लागते. भविष्यात इतर कोणीही असा क्लेम करू नये यासाठी खबरदारी म्हणून हे केले आहे. त्याच्या तपासाला वेळ लागत असल्यामुळे क्लेम मिळवण्यास थोडा उशीर होईल. EPFO
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://epfindia.gov.in/
हे पण वाचा :
FD Rates : Axis-ICICI बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
Smartphone घेताय… जरा थांबा !!! 20 हजार रुपयांखालील ‘हे’ सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन पहा
SBI चे होम लोन महागले, बँकेकडून किमान व्याजदरात वाढ !!!
Bank FD Rates : ‘या’ मोठ्या बँकांकडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवे दर पहा