नवी दिल्ली । केंद्र सरकारने 6.5 कोटी लोकांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भविष्य निर्वाह निधी सदस्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे (PF Interest) ट्रान्सफर करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला हे पैसे आतापर्यंत मिळाले आहेत की नाही हे तुम्ही तुमचे PF खाते तपासून पाहू शकाल. तुम्ही घरबसल्या तुमच्या PF खात्याचा बॅलन्स तपासू शकता.
किती व्याज मिळेल ?
2020-21 या आर्थिक वर्षासाठी PF वर 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने यापूर्वीच हिरवा सिग्नल दिला होता. कामगार आणि रोजगार मंत्रालयानेही या निर्णयाला सहमती दर्शवली होती. आता EPFO ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा भविष्य निर्वाह निधी कापला गेला असेल, तर तुम्ही 4 सोप्या मार्गांनी तुमचा PF बॅलन्स तपासू शकता.
मिस कॉलद्वारे
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर, EPFO कडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या PF खात्याची माहिती मिळेल. यासाठी बँक खाते, पॅन आणि आधार UAN शी लिंक असणे आवश्यक आहे.
sms द्वारे
जर तुमचा UAN EPFO मध्ये रजिस्टर्ड असेल, तर तुमचे नवीनतम योगदान आणि PF बॅलन्स माहिती मेसेजद्वारे मिळू शकेल. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. ही सर्व्हिस इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे. हा SMS UAN च्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून पाठवावा लागेल.
EPFO च्या माध्यमातून
यासाठी तुम्हाला EPFO च्या वेबसाइटवर जावे लागेल.
येथे Employee Centric Services वर क्लिक करा.
आता View Passbook वर क्लिक करा.
पासबुक पाहण्यासाठी UAN ने लॉगिन करा.
umang अॅपद्वारे
तुमचे उमंग अॅप (Unified Mobile Application for New age Governance) उघडा आणि EPFO वर क्लिक करा.
दुसर्या पेजवर, employee centric services वर क्लिक करा.
येथे View Passbook पर्यायावर क्लिक करा.
तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड (OTP) नंबर टाका.
रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
यानंतर तुम्ही तुमचा PF बॅलन्स तपासू शकता.