मुस्लिम तरुणाशी लग्न करण्याची इच्छा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केरळा स्टोरी दाखवला, तरीही तिने उचललं ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण देशात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच जोर धरत आहे. आधी आफताब आणि श्रद्धा नंतर साक्षी आणि साहिल या दोन्ही प्रकरणांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली असतानाच आता अजून एक हिंदू तरुणी मुस्लिम मुलाचा हात धरून घरातुन पळून गेली आहे. विशेष म्हणजे भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी या मुलीचे डोळे उघडावे म्हणून तिला केरळा स्टोरी हा चित्रपटही दाखवला, परंतु तरीही तिने त्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय कायम ठेवला आणि घरातून पळून गेली.

नेमकं काय घडलं ?

11 मे रोजी कुटुंबातील सदस्यांना न सांगता एक नर्सिंगची विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी घरातून पळून मुस्लिम तरुणासोबत राहायला गेली होती. त्यानंतर संध्याकाळी बुरखा घालून तिने पोलीस स्टेशन गाठलं. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या तिथे पोहोचल्या आणि त्या तरुणीला समजावण्याचा प्रयत्न करू लागल्या. बराच वेळ समजावून सांगितल्या नंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तिला लव्ह जिहाद बद्दल माहिती देऊन द केरला स्टोरी दाखवली. या लव्ह जिहाद मुळे किती मुलींची फसवणूक झालेली आहे, हे देखील तिला समजावले. परंतु एवढं सगळं समजावून देखील त्या तरुणीने तिचा निर्णय बदलला नाही.

18 – 19 मे ला ही तरुणी रात्री घरातील दागिने आणि 70 हजार रुपये रोख घेऊन घरातून पळून गेली. खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी समजावण्याचा तिच्यावर काहीच फायदा झाला नाही. भोपाळ येथील कमला नगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. तपासानंतर समजले की ही तरुणी युसुफ नावाच्या मुलासोबत पळून गेली आणि तिची मागणी पूर्ण करून युसुफने तिला बुरखा घालायला लावलाच.

दरम्यान, खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केरळा स्टोरी या चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. लव्ह जिहादमुळे हिंदू मुलींवर अत्याचार होत असून त्यांना कृप्रथेच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तान आणि दुसऱ्या मुस्लिम देशांसोबत मिळून आपल्या देशात लपलेले गद्दार हिंदू तरुण-तरुणींना फसवत आहे. आणि त्यांचे धर्मांतरण करून त्यांना आपल्याच देशाच्या विरोधात उभं करत आहेत असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी म्हंटल.