‘प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही ज्या पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, त्याची कशाला नोंद घेताय!’ अजित पवारांनी उडवली पडळकरांची खिल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन उद्या होणार होते, मात्र त्या आधीच आज पहाटे शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण केलं. सोबतच शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर घणाघाती टीका केली. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता, त्यांनी पडळकरांची चांगलीच खिल्ली उडवली. ज्या पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, “अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचलीय. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही, उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. भाजपसारख्या प्रमुख पक्षाकडून तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय”.

दरम्यान, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण केलं. दरम्यान, याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment