LPG सिलेंडरसाठीसुद्धा तुम्हाला मिळू शकेल 30 लाखांपर्यंत विमा संरक्षण, अशी आहे क्लेमची प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील अनेक लोकं आता स्वयंपाकासाठी LPG वापरतात. जर LPG सिलेंडरचा (LPG Cylinder) काळजीपूर्वक वापर केला नाही तर अपघाताचा धोका नेहमीच असतो. एलपीजी सिलेंडरच्या अपघातामुळे कुटुंबातील सदस्य जखमी किंवा मृत्यू होण्याचा धोका असतो. याव्यतिरिक्त, घरगुती मालमत्तेचेही नुकसान होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत, एलपीजी सिलिंडरसाठी विमा संरक्षण (Insurance for LPG Cylinder) बद्दल आधीच माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा अनपेक्षित परिस्थितीचा सामना करणे सोपे होईल.

गॅस सिलेंडरच्या स्फोटांमुळे जखमी, मृत्यू किंवा घर मालमत्तेचे नुकसान झाल्यास हे विमा संरक्षण उपयुक्त ठरेल. ऑईल मार्केटिंग कंपन्या (OMCs – Oil Marketing Companies) आणि डीलर अशा एलपीजी गॅस विमा पॉलिसी प्रदान करतात जे ग्रुप विमा संरक्षणासारखे असतात.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या ऑईल मार्केटिंग कंपन्या एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी घेतात. या पॉलिसीत एलपीजीशी संबंधित अपघात झाल्यास बाधित लोकांना दिलासा मिळू शकेल. या कंपन्यांमधील सर्व रजिस्टर्ड ग्राहकांना कव्हर मिळते.

पॉलिसी कव्हरेजमध्ये काय समाविष्ट आहे?
ऑईल मार्केटिंग कंपन्या पब्लिक लायबिलिटी इंश्योरेंस पॉलिसी घेतात, ज्या अपघातामुळे होणाऱ्या विमा नुकसानाची भरपाई करतात, जेथे LPG आगीचे मुख्य कारण आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, ज्या परिस्थितीत आगीचा मुख्य कारण दुसरा स्त्रोत असेल अशा परिस्थितीत या विमा संरक्षणाचा लाभ उपलब्ध होणार नाही. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने जुलै 2019 मध्ये या विमा संरक्षणाची माहिती राज्यसभेलाही दिली आहे.

त्यात असे म्हटले आहे की, मृत्यू झाल्यास अपघातासाठी प्रती व्यक्ती 6 लाख रुपये दिले जातील. यामध्ये वैद्यकीय खर्चाची रक्कम 30 लाख रुपये असेल, त्यापैकी प्रति व्यक्ती जास्तीत जास्त 2 लाख रुपये उपलब्ध असतील. घरगुती मालमत्तेची हानी झाल्यास ग्राहकांच्या रजिस्टर्ड घरामध्ये प्रत्येक प्रकरणात जास्तीत जास्त 2 लाख रुपये कव्हर केले जातील.

क्लेमची प्रोसेस काय आहे?
येथे हे लक्षात घ्यावे लागेल की, सर्व रजिस्टर्ड एलपीजी ग्राहकांचा समावेश या सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्याद्वारे घेण्यात आलेल्या विमा पॉलिसीमध्ये आहे. अशा परिस्थितीत, एखादा अपघात झाल्यास त्या व्यक्तीने डिस्ट्रीब्युटरला ताबडतोब लेखी कळवावे. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर ही माहिती ऑईल कंपनी आणि विमा कंपनीला देईल. यानंतर, ऑईल कंपनीकडून संबंधित अपघातामुळे, विमा क्लेमची औपचारिकता पूर्ण केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.