दम्याच्या त्रासाला कंटाळलात तर ‘हा’ व्यायाम करून मिळवू शकता नियंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लोकांचे राहणीमान बदलले आहे त्यामुळे लोकांना कोणत्याही गोष्टींकडे द्यायला वेळ नाही आपल्या आरोग्यासाठी सुद्धा लोकांना कामाच्या व्यापामुळे लक्ष देता येत नाही. आधुनिक पद्धतीच्या राहणीमानामुळे ना कोणी कोणाकडे जात आहे ना कोणी कोणाकडे येत आहे. त्यामुळे एकाला जीव सुखी अशी लोकांची जगण्याबात ची परिभाषा झाली आहे. दररोजच्या व्यस्त दिनचर्येमुळे बरेच लोक चुकीच्या सवयींना बळी पडतात. ज्यामुळे त्यांना अनेक आजार वेढतात. जर आपल्याकडे व्यायामासाठी किंवा योग करण्यासाठी पुरेसा वेळ नाही तर केवळ या कपालभातीच्या प्राणायामाच्या साहाय्याने देखील निरोगी राहता येऊ शकतं. संधीवात या आजाराला ना आत्तापर्यन्त कोणते मेडिसिन उपलब्ध आहे ना कोणता डॉक्टर त्यावर निष्कर्ष काढत . त्यामुळे संधीवात हा कुटुंबाकडून येणारा आजार आहे. त्यासाठी घरगुती पद्धतीने व्यायाम करून सुद्धा यावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवू शकता.

कसे करावे हे आसन—

— कपालभाती प्राणायाम करण्यासाठी सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासनात बसावे आणि आपल्या तळहाताला घुडग्यावर ठेवा. शरीराला ताठ ठेवा.

— आपली पूर्ण क्षमता लावून सामान्यांपेक्षा थोडा दीर्घ श्वास घेत आपली छाती फुगवा. नंतर झटक्याने श्वास सोडत पोटाला आत ओढा.

— जसेच आपण आपल्या पोटाच्या स्नायूंना सैल सोडता, श्वास आपोआपच फुफ्फुसात पोहोचते.

— कपालभाती करताना लक्षात ठेवावं की आपण घेतलेला श्वास हा एकाच झटक्यात बाहेर काढावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’