हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या MMRDA अनेक निर्णय घेत असून त्याचा फायदा नागरिकांना होताना दिसून येत आहे. आता त्यातच मुंबईहुन पालघरला जाण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यासाठी वर्सोवा – विरार सागरी सेतूचा विस्तार केला जाणार आहे. MMRDC ने यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. कसा असेल हा विस्तार तेच जाणून घेऊयात.
टप्प्याटप्याने विस्तार करण्याचा घेतला होता निर्णय
MMRDC ने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबई आणि पालघरचा टप्पा लवकरच गाठता येणार आहे. तोही ट्राफिकशिवाय. त्यामुळे ही नागरिकांसाठी आनंदाची बातमी मानली जात आहे. हा विस्तार करण्यासाठी MMRDC ने प्रयत्न सुरु केले आहेत. याआधी MMRDC ने वरळी ते वांद्रे, वांद्रे ते वर्सोवा, वर्सोवा ते विरार पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच हा मार्ग पुढे विरार ते पालघर असा टप्प्याटप्याने विस्तार केला जाईल असा निर्णय घेण्यात आला होता. आता याच निर्णयाला प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
जपानच्या कंपनीने दिले मार्गीकेसाठी कर्ज
2010 साली वांद्रे ते वरळी दरम्यान 5.6 किलोमीटरची एक सी लिंक तयार करण्यात आली होती. वांद्रे ते वर्सोवाच्या 17 किलोमीटरच्या सी लिंकचे काम हे प्रगतीपथावर असून वर्सोवा ते विरार मार्गासाठी जपानच्या जायका संस्थेने कर्ज दिले आहे. या मार्गीकसाठी 61424 कोटी एवढा खर्च लागणार आहे. या मार्गाचे अंतर हे 42.75 किलोमीटर एवढे आहे. आता हाच मार्ग पुढे पालघर पर्यंत वाढवला जाणार आहे. हा सी लिंक वर्सोवा – विरार मार्गावर मीरा – भाईंदर, वसई, विरार या चार मार्गाना जवळ करेल. तर अंधेरी पश्चिम विरारलाही ही मार्गीका जोडली जाणार आहे. यात उत्तन, गोराई,वसई, विरार या चार मार्गांवर टोल प्लाझा असणार आहेत.
कोणाला होईल याचा फायदा?
या मार्गीकांचा विस्तार झाल्यावर याचा फायदा हा नक्कीच उद्योगाला होऊ शकतो. मढ आयलंड, गोराई बीच, आगाशी रोड, मानोरा खाडी पुल, भाईंदर – वसई खाडी पुल या ठिकाणा ही लाईन जोडली जाणार असल्यामुळे याचा फायदा नक्कीच यांना होणार आहे.